• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

क्रांती सिंहावलोकन

स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी अनेक अडचणी वर मात करत क्रांती साखर कारखान्याची स्थापना केली. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात साखर कारखाना काढणे हे तसं मोठं आव्हानच होते. कारखान्याचा पहिला गाळप हंगाम हा सन २००२-२००३ मध्ये झाला. काखान्याच्या यशस्वी सुरवाती नंतर गरज होती ती, कार्यक्षेत्रात गाळप क्षमते इतका ऊस उत्पादन वाढवण्याची. परंतु दूरदृष्टीच्या बापूनी हेही आव्हान पेलले व एकरी ऊस उत्पदान वाढीचे अत्यंत अवघड कार्य हाती घेतले. या साठी सर्व प्रथम त्यांनी स्वतंत्र उसविकास विभागाची स्थापना केली.

बघता बघता गेल्या १० वर्षात त्यांनी व अरुण लाड यांनी कार्यक्षेत्रातील ऊस शेतीत आमुलाग्र बदल घडवून आणला.

image

ऊस गाळप व ऊस दर माहिती

अ. न हंगाम हंगाम दिवस ऊस गाळप मे. टन साखर उतारा साखर उत्पादन क्विंटल दिलेला दर प्रति मे. टन
१) २००२-०३ १०५ १९१०२२ ११.४१ % २१७१५० ७६७
२) २००३-०४ ७७ १९११२५ ११.२३ % २१५०६० ८२३
३) २००४-०५ ७१ १५१५९४ ११.२७% १७०३२० १२७५
४) २००५-०६ ११२ ३३१०९ १२.०९ % ४००४१० १४००
५) २००६-०७ १४७ ४७३१९४ ११.५१ % ५४४८५० ९७५
६) २००७-०८ १६२ ५०२७२१ १२.९२ % ६४९३०० १०५०
७) २००८-०९ ११४ ३५६९३५ १२.०१ % ४२८८५० १८३०
८) २००९-१० १६६ ५५९०६७ १२.४४ % ६९५९५० २३१०
९) २०१०-११ १८६ ६१६११० ११.८५ % ७२९६०० २३५०
१०) २०११-१२ १५७ ५४०१६७ १२.२७% ६६२६९० २४५०
११) २०१२-१३ १५२ ६५८३५ १२.३१ % ८१०५४० २६७०
१२) २०१३-१४ १४९ ७७२३१७ १२.४० % ९५७१०० २५३०
१३) २०१४-१५ १६८ ८६२७०२ १२.४८ % १०७६५०० २४११
१४) २०१५-१६ १५१ ८४६२२४ १२.५० % १०५६९३० २५२८
१५) २०१६-१७ ११२ ६३५००६ १२.३१ % ७८११०० ३३५५

पुरस्कार

दुष्काळी परिस्थिती व लोकरी मावा यामुळे प्रथमचे (२००२ - ०३, २००३ - ०४ व २००४-०५) तीनही हंगामात ५०% पेक्षा कमी गाळप क्षमतेचा वापर झाला नंतर हंगाम २००५-०६ ते २०१२-१३, मात्र प्रत्येक वर्षी गाळपामध्ये वाढ होत गेली व पूर्ण क्षमतेने कारखाना चाललेला आहे. कारखाना अत्यंत काटकसरीने व योग्य नियोजनानुसार चालविल्यामुळे कारखान्यास खालील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले आहे.



  • राष्ट्रीय पुरस्कार
    • नॅशनल फेडेरेशन ऑफ कॉ-ऑप .शुगर फॅक्टरी लि., नवी दिल्ली.
      १)सन २०१९-२० या हंगामातील उच्च साखर उत्तर विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त २) सन २०१७-१८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ३) सन २०१६-१७ मधील तांत्रिक कार्यक्षमता विकास आर्थिक नियोजन यांचे एकत्रित यांचे थिंक दरीत एकंदरीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा
      पाटील प्रथम
      क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ४) सन २०१५-१६ च्या उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ५) सन २०१४-१५ उत साखर उतारा विभागातील सर्व सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ६) सन २०१३-१४ हा ऊस विकास विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ७)स न २००८-०९ साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ८) सन २००७-०८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ९) सन २००५-०६ च्या उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.

  • राज्य पुरस्कार
    • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी ब्रू!! पुणे.

      १) सन २०२० -२०२१ सालातील स्वर्गीय वसंतदादा पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृठ साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      २) सन २०१९-२०२० सालातील स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील या नावाने दिला जाणारा उत्कुष्ठ उस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ३) सन २०१८-२०१९ सालातील स्वर्गीय विलासरावजी देशमुख याचे नावाचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृठ उद्योजकता साखर कारखाना पुरस्कार प्राप्त.
      ४) सन २०१७-२०१८ सालातील दक्षिण विभागातील उत्कुष्ठ तांत्रिक कार्यक्षमतेचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ५) सन २०१७-२०१८ सालातील दक्षिण विभागातील उत्कुष्ठ उस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ६) सन २०१७-२०१८ सालातील स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ७) सन २०१६-२०१७ सालातील स्वर्गीय आबासाहेब उर्फ किसान महादेव वीर याचे नावाचा सर्वोत्कृठ पर्यावरण संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ८) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ९) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट विकास व संवर्धनाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      १०) सन २००८-०९ चा सर्वोत्कृष्ट होत विकास व ऊस संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त .
      ११) सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त सन.
      १२)सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.

  • सेफ्टी पुरस्कार
    • अ) नॅशनल सेफ्टी कौन्सिल.
      १) सन २००४ साली महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१३ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      २) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१४ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      ३) सनॅशनल लेव्हल सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१५ - प्रशंसापत्र प्रमाणपत प्राप्त झाले.
      ४)महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१६ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      ५) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटीशन २०१७ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.

      ब) सांगली जिल्हा औद्योगिक सुरक्षितता समिती सांगली.
      १) औद्योगिक सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१२ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.
      २) औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१४ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.

आमचा इतिहास

image

संचालक मंडळ