• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

आपणास प्रश्न आहे?

कृपया आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा

ब्रोशर

सर्व सेवा ऑफरवरील सुलभ वाचन मार्गदर्शकासाठी आमचे 2018 आर्थिक प्रॉस्पेक्टस ब्रोशर पहा.

ब्रोशर डाउनलोड करा

संगणक

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड या कारखान्याने सुरुवातीपासून आधुनिकीकरणाच्या ध्यास घेतला आहे. कारखान्यातील सर्व विभाग optical fiber cable & Point to Point Wireless Networking जोडलेली आहेत. गट ऑफिस Virtual Private Networking (VPN) जोडलेली आहेत.
सर्व विभागात सर्वंकष संगणक प्रणाली निश्चित करण्यात आलेली आहे. शेती विभागातील उसाच्या नोंदणी, तोडणी प्रोग्रॅम व ऊस विकासाच्या योजना या मोबाईल अँपद्वारे द्वारे चालतात. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी SMS & IVR सेवा तसेच कारखाना वेबसाईट वर शेतकरी विभाग चालू केला आहे. कारखाना कामकाजात सुसूत्रता व महत्त्वाच्या ठिकाणी व्यवस्थापनाचे लक्ष असावे यासाठी 45 C.C.T.V. Camera कारखान्याच्या विविध विभागात व कार्यस्थळावर कार्यरत आहे.
Internet leased line आहे. त्यासाठी Firewalls चा वापर केला जातो. Data Backup साठी NAS व Camera Backup साठी NVR चा वापर केला जातो. वजन काट्याचे ऑटोमाझेशन असल्याने ऊस उत्पादकांना अचूक वजनाचा फायदा होतो. प्रशासकीय व E-Tendering कामासाठी Internet सुविधेचा वापर केला जातो.
संगणकीकरणामुळे वेळेत व श्रमात बचत झालेली असून , सर्व कामे जलद गतीने होऊन कामकाजात सुसूत्रता अचूकता आलेली आहे. कारखान्यांमध्ये संगणक प्रणालीचा वापर करून SMS व IVR सेवा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. प्रतिवर्षी SMS व IVR सेवेचा पन्नास हजारपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी लाभ घेत आहेत. उसाचे वजन व बीलासंबंधीची माहिती होण्यासाठी आतापर्यंत ३ लाख ७५ हजार पेक्षा जास्त वेळा संबंधितांनी IVR सेवा वापरली आहे. IVR प्रणालीने ऊस वजन व ऊस बिलाची माहिती मिळण्यासाठी (०२३४६ )२७१७०० या नंबरवर कॉल करून, आपला सहा अंक ऊस उत्पादक कोड नंबर दाबावा लागेल.
ऊस वजनासाठी एक व ऊस बिलासाठी दोन दाबावे. कारखान्याने सर्व गट ऑफिस ऑनलाइन जोडले आहेत. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना संबंधित गट ऑफिसमध्येच त्यांची माहिती मिळते. सभासदांचा वेळ, त्रास व खर्च कमी झालेला आहे.
१) कागद विरहित ऊस नोंदणी :-
माहिती व तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात जग जवळ आलेले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर कारखान्याच्या कामकाजात केल्याने कारखान्याचे कामकाज पारदर्शक होईलच शिवाय शेतक¬यांना कारखान्याच्या सोई, सुविधा वेळेत व कमी खर्चात उपलब्ध होतील. यासाठी कारखान्याने सर्व कामकाज कागद विरहीत करण्याचा संकल्प केला आहे. त्याप्रमाणे कारखान्याने पहिल्या टप्प्यात शेतक¬यांची ऊस नोंद कागदाचा वापर न करता मोबाईल अॅपद्वारे ऊस नोंदीचे कामकाज यशस्वी केले आहे. याद्वारे शेतक¬यांच्या ऊसाची नोंद त्यांच्या शेतावर ऊस शिवाराचा व शेतक¬याचा फोटो सद्याच्या पिक परिस्थितीसह घेतला जातो. त्याशिवाय पुर्ण क्षेत्राचे मोजमापही जी.पी.एस. तंत्रज्ञानाने करून, तंतोतंत ऊस क्षेत्र व पीक नोंद तारीख घेतली जाते. त्यामुळे शेतक-यांच्या ऊस तोडीमध्ये पारदर्शकता आली असुन, लागण केलेल्या ऊस नोंदीच्या तारखेबाबत होणारे वाद, विवाद बंद झाले आहेत. त्याशिवाय शेतक¬यांचा 7/12,उताऱ्याचा फोटो घेतला जातो. त्यामुडे उसाच्या नोंदी शेतकरयांच्या बांधावर जाऊन प्रत्येक्ष ऊस पिकाची पाहणी करून सर्व माहिती मोबाईलवरती घेतली जाते .तसेच ऊस नोंदणीचा शेतकऱ्याना त्वरित पाठविला जाईल.त्यामुडे नोंदणीची माहिती लगेच मिळते.
२) अद्यावत ऊस तोडणी कार्यक्रम :-
क्रांती कारखान्याचा ऊस तोडणी कार्यक्रम पुर्णत: अद्यावत व संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून राबविण्यात येत आहे. कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस क्षेत्राचा ऊस तोडणी कार्यक्रम तयार करणेसाठी ऊस लागणीचा महिना, ऊसाची जात व ऊसाची पक्वता या तीन प्रमुख बाबींचा अवलंब केला जातो. त्यामुळे संशोधन केंद्राने कोणती जात किती महिन्यात पक्व होते, त्या पक्वता वेळेप्रमाणे गळीत हंगामातील दर पंधरवडयाचा स्वंतत्र तोडणी कार्यक्रम तयार केला जातो. तोडणी कार्यक्रमातील ऊस धारक शेतक¬यांचे नांव न देता कोड देवून ऊसाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत आणण्यात येतो. ऊस् नमुना तपासणी केलेल्या प्रयोगशाळेतील रिकव्हरी रिपोर्ट नुसार सर्वात जास्त साखर उतारा असणा¬या म्हणजे पुर्ण पक्व झालेल्या ऊसाची तोडणी क्रमानुसार दिली जाते. पक्वतेनुसार पात्र झालेल्या पहिल्या दहा शेतक¬यांची यादी शेतीमदतनीस यांचे मोबाईलवर प्रदर्शित होते. या क्रमवारीनुसार ऊसाची तोडणी शेतक¬यांना देण्यात येते. प्रदर्शित यादीतील शेतक¬यांची तोडणी पुर्ण होवून किंवा इतरत्र विल्हेवाट होवून क्षेत्र कमी होईल तसे त्याखालील नविन शेतक¬यांची पात्र यादी प्रदर्शित होते. त्यामुळे शेतक¬यांचा पुर्ण पक्व झालेला ऊस गळीतास आल्याने ऊसाचे एकरी उत्पादनात वाढ होते. पक्व न झालेल्या अपरिपक्व ऊसाची तोडणी झालेस एकरी उत्पादनात घट येते. हे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. शिवाय संगणकीय प्रणालीमुळे क्रमवार तोडी राबविण्यात येत असल्याने शेतक¬यांना कारखान्याकडे तोडीबाबत विचारणा करावी लागत नाही. त्यामुळे शेतक¬यांचा वेळ व आर्थिक खर्च होत नाही. शिवाय मानसिक त्रासही होत नाही. या अद्यावत व शास्त्रोक्त तोडणी कार्यक्रमाचे महत्व पटल्याने अनेक शेतकरी हमखास व शाश्वत तोडणी मिळणेच्या विश्वासात पात्र झालेले आहेत.
३) मोबाईलवरून फिल्ड स्लिप देणे (वजन स्लिप ) :-
प्रत्येक वाहनास एक याप्रमाणे एन.एफ.सी कार्ड दिली आहेत.त्यामध्ये त्यांची सर्व माहिती असते वजन स्लीप देताना कर्मचारी एन.एफ.सी कार्ड मोबाईलला लावलेस त्याची त्याची तोडणी व वाहतूकीची संनपूर्ण माहिती फीड होते व वाहन यार्डात आल्यानंतर त्याच्या नंबर रजिस्टर होतो.
४) ऊस वाहतुक वाहनासाठी आर.एफ.आय.डी. :-
ऊस वाहतुक करणा¬या सर्व वाहनांसाठी (आर.एफ.आय.डी.)टॅग चा वापर केला जातो. त्यामध्ये टॅग प्रत्येक ट्रक, ट्रॅक्टर बैलगाडीस कायमस्वरूपीचा वेल्डींग करून घट्ट बसविला आहे. वाहन ऊस भरून, केनयार्ड गेटसमोर आलेनंतर स्वयंचलित मशिनद्वारे वाहन/बैलगाडी ची नोंद करण्यात येते. त्यामुळे ऊस खाली करणेसाठी पारदर्शीपणे कामकाज होते. शिवाय यार्डात शिल्लक असणा¬या ऊसाची माहिती वेळोवेळी अद्यावत मिळते. आवश्यकतेनुसार ऊस तोडणी नियंत्रित करता येते. यार्डातील शिल्लख ऊसाची माहिती तंतोतंत मिळते त्यानुसार गाळपाच्या वेगाचे नियोजन करता येते.ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी टॅग आरएफआयडी चा वापर केला जातो.

100% शुद्धता

उत्पादन

24 तास सेवा