सोमवार ते शनिवार
सर्व सेवा ऑफरवरील सुलभ वाचन मार्गदर्शकासाठी आमचे 2018 आर्थिक प्रॉस्पेक्टस ब्रोशर पहा.
Distillery Unit ESR (FORM V) 2021महत्वाची वैशिष्टे:-पर्यावरण, वन आणि हवामानविषयक मंत्रालयातील नवी दिल्ली येथे साखर 5000 टीसीडी व 1 9 .70 मेगावॅटने पर्यावरण मंजूरी प्राप्त झाली आहे. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून साखर 8500 टीसीडी व 36 मेगावॅटने पर्यावरणीय मान्यता प्राप्त केली आहे. पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामानविषयक मंत्रालयाकडून 60 केएलपीडीसह डिस्टीलरीसाठी पर्यावरण मंजूरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यावरणीय संरक्षणासाठी 2016-17 मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथून फॅक्टरीला 'कै. किसान महादेव उर्फ अबासाहेब वीर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा:- क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापु लाड माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळेची स्थापना माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते 23 जानेवारी 2010 साली करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय् कृषी विकास योजने अंतर्गत हा महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प आहे. प्रयोगशाळेतील तपासणी सुविधा अत्यंत कमी शुल्कामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांसाठी उपलब्ध आहे. प्रयोगशाळेची ठळक वैशिष्टये :- १) सर्व सोयींयुक्त स्वतंत्र व प्रशस्त इमारत.. २) मुख्य व सुक्ष्म मुलद्रव्यांचे पृथ:करण करणेसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री (नायट्रोजन ऍ़नालायझर,ऍ़टॉमिक ऍ़बसॉरप्शन स्पेक्ट्रोफोटोमिटर, युव्ही व्हिसीबल स्पेक्ट्रोफोटोमिटर, फ्लेम फोटोमिटर इत्यादी. ३) सर्व प्रकारची सेंद्रीय खते (शेणखत, गांडुळखत, प्रेसमड, कंपोष्ट खत) तपासणीची सुविधा तसेच विविध पिकांचे पान व देठ तपासणीची सोय. ४) तपासणी कामी अनुभवी व प्रशिक्षित कर्मचा-यांची नियुक्ती तसेच माती, पाणी व पिकांचे घटक तपासणीनुसार, अनुभवी व तज्ञ अधिका-यां मार्फत शस्त्रोक्त पध्दतीने खतमात्र. उपाय योजना व तांत्रिक सल्ला देण्याची सुविधा.५) शेतकरी निहाय शेतीची पंचवार्षिक आरोग्य पत्रिका देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प. ६) दैनिक तापमान, आर्द्रता, वारा व पाऊस मोजण्याची उपग्रहांशी निगडीत आद्यावत यंत्रप्रणाली. ७) तपासले जाणारे घटक - सामु, विद्युत वाहकता, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रीय कर्ब, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फर व सुक्ष्म मुलद्रव्ये (लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन). ८) तपासणी दर- माती परिक्षण - ५० /- पाणी परिक्षण - १००/- पान देठ परिक्षण- ३७५ /-