• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

ज्यामुळे आम्हाला भिन्न बनवते

आमचे सुविधा

माती, पाणी, देठ परिक्षण प्रयोगशाळा

जमिनीची सुपीकता टिकून राहावी व रासायनिक खतांचा संतुलित वापर व्हावा यासाठी कारखाना कार्यस्थळावर अद्यावत माती पाणी व पान देठ तपासणी प्रयोगशाळेत मुख्य अन्नद्रव्ये भौतिक घटक सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासण्याची सुविधा केली आहे या प्रयोगशाळेला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रक्कम रुपये तीस लाख इतके अनुदान प्राप्त झाले आहे अहवाल वर्षात प्रयोगशाळेतून कार्यक्षेत्रातील ३५६२ माती नमुने व ८२२ पाणी नमुने तसेच वृद्ध आरोग्य अभियानांतर्गत १५००० शासकीय माती नमुने तपासून दिले आहेत कार्यक्षेत्रातील सर्व गावांच्या सुपीकता निर्देशांक तयार करून त्यानुसार खत मात्रा देण्याची सुविधा केलेली आहे की मग सिंचन क्षेत्रासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खत मात्रा देण्याचे सविस्तर वेळापत्रक शेतकऱ्यांना दिले जाते आपली प्रयोगशाळा महाराष्ट्रातील राज्यस्तरीय नोंदणी असणारी प्रथम क्रमांकाची अशासकीय प्रयोगशाळा आहे.

ऊस बेणे मळा

शेतक-यांच्या ऊस उत्पादनात वाढ होणेसाठी कारखाना कार्यस्थळावरती शेतक-यांना लागणा-या ऊस रोपांची निर्मिती करून ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री केली जाते. सन २०१३-१४ हंगामामध्ये कारखान्याने ५४ हेक्टर क्षेत्रासाठी ऊस रोपांचा पुरवठा केला.

कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा योजना

आमचे कारखाना कार्यक्षेत्रात क्रांती उपसा जलसिंचन योजना ही मा. अरूण (आण्णा) लाड यांचे मार्गदर्शनाखाली व सदर संस्थेचे चेअरमन मा. शरद (भाऊ) लाड यांचे प्रयत्नामुळे कार्यान्वित झालेली आहे. सदर संस्थेचे १३९ सभासद असून, ओलीताखाली येणारे क्षेत्र ५०० एकर इतके आहे. सदर संस्थेच्या सभासदांच्या जमीनीवरती कोणत्याही वित्तीय संस्थेचा बोजा निर्माण केलेला नाही. कारखान्याने सदर योजना केंद्र शासनाच्या एस.डी.एफ. योजनेत योजनेतून कर्ज घेवून उभारणी केलेली आहे. सदर संस्था पूर्ण होवुन कार्यान्वित झालेली आहे. सदर संस्था कार्यान्वित झाल्यामुळे कारखान्यास हक्काचा ३५००० मे.टन. ऊस उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर कारखान्याने कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या कृष्णामाई लिप्ट इरिगेशन नं.२, आमणापूर . न्यु अरूणोदय -कमळापूर, वेरळामाई उपसा - बांबवडे, या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून, सदर कार्यक्षेत्रातील शेतकक-यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम कारखान्याने केलेले आहे.

पायलट योजना

कार्यक्षेत्रातील शेतक-यांना ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीने पायलट योजनेमध्ये समाविष्ठ केले असून, सदर शेतक-यांच्या शेतावरती मशागतीपासून ऊस तोडणी कार्यक्रमापर्यंत होणारा सर्व खर्च कारखान्यामार्फत ६% व्याज दराने दिला जातो. तसेच सदर शेतक-यांस तांत्रीक मार्गदर्शन मोफत दिले जाते. सन २०१३-१४ वर्षामध्ये कारखान्याने ३२७ हेक्टर वरती पायलट योजना राबविली असून, त्यासाठी रू.१०७.७८ लाख गुंतवणूक केली आहे.

रासायनिक, द्रवरूप व कंपोष्ट खत पुरवठा

कारखान्यास प्रेसमड विक्रीपासून कारखान्याचा फायदा होत असताना सुध्दा सदर प्रेसमडचे कंपोष्ट खतामध्ये रुपांतर करून, शेतक-यांना वाजवी किंमतीने सदर कंपोष्ट खत दिले जाते. कारण सध्या शेतीसाठी शेणखत कमी पडत असल्यामुळे व शेतीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व ऊस उत्पादनात वाढ होणेसाठी कारखान्याने तोटा सोसुनही शेतक-यांना कंपोष्ट खताचा पुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे शेणखताचा तुटवडा कमी करणेच्या दृटीने कारखान्याने कार्यस्थळावर गांडुळ खत प्रकल्प उभारला असुन त्यातून निर्माण होणारे गांडुळ खत शेतक-यांना कमीत कमी दराने दिले जाते. त्याच बरोबर शेतक-यांना ऊसास योग्य वेळी खतांची मात्रा देणेसाठी चांगल्या प्रतीची रासायनिक व द्रवरूप खते उपलब्ध करून उधारीने दिली जातात. वरील प्रमाणे हंगाम २०१३-१४ मध्ये कंपोष्ट, गांडुळ, रासायनिक व द्रवरूप खते या स्वरूपात ४१३ हेक्टरसाठी पुरवठा केला आहे.

ठिंबक सिंचन

शेतीसाठीचे पाण्यामध्ये बचत करणे तसेच जमीनीचे आरोग्य सुधारून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन पुढील ३ वर्षात घेणेसाठी, महाराष्ट्र शासनाने ऊस पिक हे पुढील ३ वर्षात १००% ठिंबक सिंचन योजने योजनेवरती घेणेकरिता आवाहन केलेले आहे. कारखान्याने सन २००६-०७ पासूनच त्यात शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व ऊस उत्पादनातही चांगली वाढ झालेली आहे. कारखान्याने आज अखेर १६०० हेक्टर वरती ठिंबक सिंचन योजना राबविणेसाठी रू.९३३.०६ लाख कमीत कमी व्याज दरात अर्थ पुरवठा शेतक-यांना केलेला आहे. तसेच गळीत हंगाम २०१७-१८ पासून ठिंबक सिंचन योजने वरील, आलेल्या ऊसास प्रति एकरी रू.७,०००/- अनुदान कारखान्यामार्फत शेतक-यांना दिले जाणार आहे.