• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

ज्यामुळे आम्हाला भिन्न बनवते

आमचे सुविधा

आर्थिक मदत/सभासद विमा

कारखान्याचे सर्व सभासदांचा प्रत्येक रुपये १ लाख किमतीचा अपघाती विमा उतरविलेला आहे. सदर योजना कारखान्यांने सन २०११-१२ पासून कार्यानिमित्त केला असून, त्याचा लाभ अनेक ऊस उद्पादक शेतकऱ्यांना होत आहे..

प्राथमिक आरोग्य सुविधा

प्रथमोपचार म्हणजे एखाद्या व्यक्तीस अचानक आजार किंवा दुखापत झालेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करणे, ज्यामुळे जीवन वाचवणे, बिघडलेली स्थिती टाळणे किंवा पुनर्प्राप्तीचा प्रचार करणे शक्य होते.कारखान्याचे सर्व सभासदांचा प्रत्येक रुपये १ लाख किमतीचा अपघाती विमा उतरविलेला आहे. सदर योजना कारखान्यांने सन २०११-१२ पासून कार्यानिमित्त केला असून, त्याचा लाभ अनेक ऊस उद्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

पाणी-पूरवठा

कारखान्याने कार्यक्षेत्रामधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बांबवडे येथे नवीन गाव विहीर काढून तिचे बांधकाम करून, गावास नियमित पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.

वृक्ष लावगड

कारखान्याचे केंद्र व राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीसाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून कारखान्याचे चेअरमन मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कारखान्यात कार्यक्षेत्रातील ७१ गावांमध्ये ७० हजार वृक्ष लावून त्याची पुढील ३ वर्षांमध्ये संगोपन करण्याचे काम हाती घेतले असून, आज अखेर ४० हजार वृक्ष लावण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचे संगोपन चालू आहे.

विज बचत धोरण

कारखानाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत व नगर पालिका हद्दीत स्ट्रीट लाईट वरती ७० लाख रुपयाचे ४५ वॅटचे बल्ब लावण्याचे कारण पूर्ण झाल्या.

शैक्षणिक सुविधा

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व अनुत्पादक यांच्या मुलांना दर्जाचे शिक्षण मिळावे, हा हेतू मा. बापूंचा होता. त्याची पूर्तता म्हणून कारखाना कार्यक्षेत्रावर के. जी. १ पासून १२ पर्यंत शिक्षणाकरिता क्रांती इंटरनॅशनल स्कूल उभारणी केली आहे. या स्कूलमध्ये ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील गोर-गरीब कष्टकऱ्यांची मुले शिक्षणासाठी नाना पाटील बोर्डागची स्थापना केली आहे. त्याचबरोबर सदर विध्यार्त्याना अद्यावत व सर्व सोयीनीयुक्त अशी इमारत सुद्धा उभारणी केलीली आहे.

दुष्काळ निवारण

कारखान्यांनी २००६ ते १२ परत दुष्काळी परिस्थिती मध्ये आटपाडी येथे टॅंकरने पाण्याचा पुरवठा केलेला आहे. तसेच आटपाडी येथील चारा छावणीसाठी चारा पुरवण्याचे काम कारखान्यामार्फत केलेले आहे. तसेच शासनाच्या अहवालानुसार वेळोवेळी, दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा, पाणी पुरवण्याचा कारखान्यामार्फत केले आहे.

सामाजिक काम

कारखान्याचे कार्यक्षेत्रातील नागराळे, कुंडल, दुधोंडी येथे समाज मंदिराचे बांधकाम करून दिलेले असून, कुंडल व कुंभारगाव येथील धोबीघाट बांधून दिलेला आहेत. तसेच कुंडले येथे मुस्लीम दफन भूमीचे बांधकाम करून दिलेले आहे. तसेच कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये, शाळांचे मागणीप्रमाणे डिजिटल क्लास रूम साठी येणारा संपूर्ण खर्च कारखाना करीत आहे. त्याप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील क्षारपड जमीन सुधारणेसाठी चर खुदाई तसेच पाणंद रस्त्यावर मुरुमीकरण कारखान्यामार्फत केले जात आहे. कार्यक्षेत्रातील देवालयाध्ये मागणीप्रमाणे पेविंग ब्लॉक, बॉच काम सुरू आहे.

कुस्ती प्रशिक्षण केंद्र

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांची मुले क्रिडा क्षेत्रामध्ये नावलौंकिक मिळविण्यासाठी कारखान्यामार्फत आद्यावत असे, कुस्ती केंद्र कारखाना कार्यस्थळावर असून, त्यामध्ये १२० पैलवान सध्या प्रशिक्षण घेत आहेत.त्यांना त्यांच्या वजन गटाप्रमाणे मानधन सुध्दा कारखान्यामार्फत् दिली जात आहे.

कल्याणकारी योजना राबविणे

कारखान्यातील अधिकारी कामगार कर्मचारी यांच्या प्रत्येकी चार लाख अपघाती विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे केलेला आहे सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो त्याद्वारे सर्वांना सुरक्षितेचे महत्त्व पटवून दिले जाते. सर्वांना सुरक्षा साधने दिली जातात. त्यामध्ये सेफ्टी बूट, हातमोजे, गॉगल, हेल्मेट, इतर कामगार कल्याण मंडळात आर्थिक मदत दिली जाते. सेवा मंडळामार्फत कर्मचारी मयत झाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच आजाराकरिता रुपये पंचवीस हजार मदत दिली जाते.